कळवण उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ. कश्मिरा संखे (भा.प्र.से.) यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. त्यांच्या या निवडीबद्दल कळवण प्रांत कार्यालयात तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.