नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता पॅम्पेलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजीटल तसेच सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. 15 जानेवारी रोजी होणा-या नमुंमपा निवडणूकीमध्ये कर्तव्यासाठी नेमणूक झालेल्या 139 महिला व 291 पुरुष अशा 430 कर्मचा-यांनी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपआयुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी श्रीम.स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचा-यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन सेल्फी काढत सर्व मतदार नागरिकांना केले.