शिरपूर: तऱ्हाडी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून 38 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Sep 17, 2025 तालुक्यातील तऱ्हाडी येथील 38 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.जितेंद्र संतोष भामरे (वय 38) रा.तऱ्हाडी ता.शिरपूर जिल्हा धुळे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.त्याने 12 सप्टेंबर रोजी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते.दरम्यान त्याचेवर धुळे येथे उपचार सुरू असताना 16 सप्टेंबर रोजी मयत झाला .याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद केली.