स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसंपन्न शहर अशीही नवी मुंबईची ओळख असून नागरिकांना समाधानकारक स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा स्वरुपात पुरविण्यातही नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे. याकरिता महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमितपणे व सातत्याने तपासली जात असते. तथापि इंदोर शहरात नुकत्याच पिण्याच्या पाण्यातून घडलेली दुर्घटना बघता पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी व सांडपाण्याची वाहिनी जवळजवळ असल्यास अशाप्रकारची दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नमुंमपा क्षेत्रात यादृष्टीने संपूर्ण काळजी घेत आवश्यक ती अधिकची खबरदारी घेण्याच्या तसेच जल संकलन, साठा व वितरण व्यवस्थेमधील सर्व स्तरावर तातडीने उपाययोजना करणेबाबत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागास निर्देश दिले.