संगमनेर: बोटा परिसराला भूकंपाचे जोरदार धक्के; नागरिकांत भीतीचे वातावरण
बोटा परिसराला भूकंपाचे जोरदार धक्के; नागरिकांत भीतीचे वातावरण संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बोटा परिसर मंगळवारी दुपारी अचानक हादरला. 3 वाजून २७ मिनिटांनी आलेल्या भूकंपाच्या झटक्याने घरावरील पत्रे हलली, तर मांडणीवरील वस्तू व भांडी खाली कोसळली. या घटनेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घाबरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. झटके बसल्यानंतर अनेकांनी घराबाहेर पळ काढला. अचानक हादऱ्याने लोकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.