रस्त्याने पायी जात असलेल्या एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिली, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना ११ डिसेंबर रात्री साई बाजार, दिघी येथील सार्वजनिक रोडवर घडली.याबाबत जखमी झालेल्या महिलेच्या मुलाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.