सेलू: बोर धरणाचे ३ दरवाजे उघडून २३.३३ क्यूमेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग; नागरिकांनी सतर्क राहण्याचे सिंचन विभागाचे आव्हाहन
Seloo, Wardha | Sep 27, 2025 सेलू - तालुक्यातील बोर जलाशयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील साठा ९५.४६ टक्क्यांवर पोहोचला असून धरण सुरक्षेच्या दृष्टीने आज ता. २७ शनिवारला दुपारी १२ वाजता धरणाचे ३ दरवाजे उघडून २३.३३ क्युमेक्स (घनमीटर प्रति सेकंद) पाणी बोर नदीपात्रात सोडण्यात आले आहे.