आर्णी: आगामी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात काँग्रेसची विश्रामगृह येथे आढावा बैठक पडली पार
Arni, Yavatmal | Nov 1, 2025 आज, आर्णी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी या बैठकीत सविस्तर आणि प्रभावी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे साहेब यांनी आपल्या अनुभवाने कार्यकर्त्यांना मोलाच