कोपरगाव: अस्तगाव माथा येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेस कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची उपस्थिती
राहाता तालुक्यातील अस्तगाव माथा येथे जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिव महापुराण कथेला आज १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वा.कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहिलो व भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पंडितजींचे आशीर्वाद घेतले. तसेच शिव महापुराण कथेचे भक्तिभावाने श्रवण केले.लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडत असलेल्या या कार्यक्रमात, शिवतत्त्वज्ञान व जीवनमूल्यांचा प्रसार होत आहे. एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करुन उत्कृष्ट नियोजन केले.