आज दिनांक 8 डिसेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी वरुड मार्गावर भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत गर्भवती गाईचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याबाबतीत नगर परिषदेला माहिती देताच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून मृत गाईला ट्रॅक्टर मधून उचलून देण्यात आले. या रस्त्यावरून भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनावर प्रतिबंध लावण्याची मागणी मोर्शी शहरातील नागरिकांनी केली आहे