परभणी गंगाखेड रस्त्यावरील ब्रह्मपुरी फाटा परिसरात अज्ञात दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास अज्ञात मोटरसायकल चालकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.