सावंतवाडी: सावंतवाडी पोलिसांनी अवैद्य दारु वर केली कारवाई : माजगाव गरड भागात सापळा रचून ९ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
सावंतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माजगाव येथील गरड भागात मोठी कारवाई करत ९ लाख ५७ हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व एक एर्टिगा वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यातून रविवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दिली.