परभणी: आजम चौक परिसरात अवैध गुटखा जप्त,कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी शहरातील दर्गा रोडवरील आजम चौक जवळ रोडवर शनिवारी दिनांक 1 रोजी सकाळी साडे आकरा वाजता एका व्यक्तीकडून अवैध गुटखा व रिक्षा असा एकुण 3 लाख 95 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.