विक्रमगड: रस्त्या अभावी मृतदेह डोलीतून नेण्याची वेळ; जव्हार येथील घटना
महेंद्र जाधव यांना अस्वस्थ वाटल्याने नातेवाईकांनी जव्हार येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र जाधव यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होता, जव्हार तालुक्यातील नारनोली गावापर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका भुसारपाडा गावापर्यंत जाऊ शकली. त्यामुळे मृतदेह नारनोली येथील गावी डोलीत ठेवून नेण्याची वेळ आली, दोन किलोमीटरची पायपीट करत कुटुंबीय व गावकऱ्यांनी मृतदेह घरी नेला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.