मेहकर: शिवसंकल्प शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांचे ५ नाेव्हेंबरला प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहा–केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
शिवसंकल्प शिवसेना जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर मेहकर येथे ५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केले आहे.शिवसेना संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सदर प्रशिक्षण शिबिरा संदर्भात सविस्तर माहिती दिली.