भुसावळ: सेंट ऑलायसिस शाळेच्या निषेधार्थ, भुसावळमध्ये मोर्चा; पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती
भुसावळातील सेंट ऑलायसिस स्कून आयोजित धार्मिक स्थळांच्या शैक्षणिक सहलीवरून वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक भूमिका घेत १६ सप्टेंबर रोजी शाळेविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.