दारव्हा: शेतकऱ्यांसह विविध मागण्यांना घेऊन शहरातील शिवलॉन ते उपविभागीय कार्यालयापर्यंत काँग्रेसने काढला मोर्चा
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत किंवा नुकसान भरपाई जाहीर न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीने दि. ९ ऑक्टोबरला दु. २ वा.मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी, दारव्हा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.