नांदेड: आय. जी. कार्यालयासमोर हायवाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी असलेल्या आजोबांचे देखील झाले निधन
Nanded, Nanded | Nov 30, 2025 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान आय. जी. कार्यालयासमोरील वाय पॉईंट येथे जॉगिंगहुन येत असताना आजोबा राजेश भूतके वय 48 व नातू प्रणव संपत आचार्य वय 4 वर्ष हे येत असताना हायवा क्र. RJ-04-GD-8751 च्या चालकाने भरधाव वेगाने येत सदरील आजोबा व नातू यांना धडक दिली होती यात प्रणव याचा मृत्यू तर आजोबा राजेश हे गंभीररित्या जखमी झाले होते, आजोबा राजेश यांचे देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास पोलीस सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झाली आहे.