देशातील अनेक रुग्णालयांमध्ये तरुण डॉक्टरांना सलग 36 ते 48 तास कोणत्याही विश्रांतीशिवाय ड्यूटी करावी लागते. इतर सर्व क्षेत्रांत 8-12 तासांची मर्यादा पाळली जाते. मग देशाच्या आरोग्यव्यवस्थेची कणा असलेल्या डॉक्टरांसाठीच हे वेगळे नियम का? थकवा, झोपेचा अभाव, मानसिक दबाव, शारीरिक अशक्तपणा-या सगळ्याशी झुंज देत हे डॉक्टर रुग्णांची सेवा करत असतात. सलग 36-48 तासांची ड्यूटी तात्काळ बंद करावी, 8 तासांच्या मानवीय कामाच्या मर्यादेची सक्तीने अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार सोनवणे यांनी लोकसभेत केली.