खुलताबाद: २ वर्षांनी गिरिजा प्रकल्प ओव्हरफ्लो; गोळेगावात नदी थेट गावात शिरली, तालुक्यातील अनेक गावांत भीषण पूरस्थिती
खुलताबाद तालुक्यात मुसळधार पावसामुळे आभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे कपाशी, मका, सोयाबीन, तूर, ऊस यासह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तालुक्यातील छोटे-मोठे सर्व तलाव ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहत आहेत, तर नद्यांच्या काठावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोळेगाव येथे फुलमस्था नदीचे पाणी वस्तीत शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम ग्रामस्थांनी केले. खुलताबाद शहरासह तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणारा गिरीज प्रकल्प भरला.