आठवडी बाजारामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी वाठोडा पोलीस ठाण्याने कंबर कसली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बाजारात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.बाजारात येणाऱ्या नागरिकांचे मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि पर्स चोरीला जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे सातत्याने सूचना देण्यात येत आहेत.