कनेरसर (ता. खेड) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री यमाई देवी मंदिरातील चोरीप्रकरणी दोषी ठरलेल्या अट्टल चोरट्यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. उतकर यांनी सुनावली आहे. दंड न भरल्यास अधिक 15 दिवसांची कैद भोगावी लागणार आहे.