मनोरा: पोहरादेवी येथील धार्मिक स्थळांना व नंगारा भवन येथे पालकमंत्र्यांनी दिली भेट; तीर्थस्थळ विकास आराखड्याचा घेतला आढावा
Manora, Washim | Aug 14, 2025 जिल्ह्यातील बंजारा समाजाचे ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पोहरादेवी तीर्थक्षेत्र पर्यटनदृष्ट्या आकर्षक आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी विकास आराखड्याचा आढावा दिनांक 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आला. या बैठकीत कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी तीर्थक्षेत्राचा धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत विकास कामे गतीमान करण्याच्या सूचना दिल्या.