निमगुळ शिवारात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. समितीने थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी महिलांमध्ये 'बालविवाह मुक्त भारत' अभियानांतर्गत जनजागृती केली. यावेळी अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांशी संवाद साधला. बालविवाह ही समाजाला लागलेली कीड असून, यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. ही प्रथा केवळ एका व्यक्तीच्या नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासाला अडथळा ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.