बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पुन्हा एकदा मंदिरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. श्री क्षेत्र येवलवाडी येथील प्रसिद्ध जालिंदरनाथ देवस्थानात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत दोन दानपेट्या उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या.