धरणगाव: धरणगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर
'सेवा पंधरवाडा' या विशेष अभियानांतर्गत, गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या गांधी उद्यानात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासकीय आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा होता. या शिबिराला धरणगाव नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते, आणि त्यांनी आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली.