हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी आमरण उपोषण मान्य न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते सुरेश राठोड यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज दिनांक १९ सप्टेंबर उपोषणाला स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत असून, सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपोषणस्थळी पाठिंबा दिला आहे