कल्याण: डोंबिवली उन्नत मार्गावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये बॅनर वॉर
Kalyan, Thane | Nov 27, 2025 डोंबिवली उन्नत मार्गावरून शिंदे गट आणि भाजपात बॅनर वॉर पेटला आहे. आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून या दोन्ही पक्षांचे बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमचं काम बोलतंय..फोडाफोडीच्या राजकारणाला छेद' देत..खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल असा शिंदे गटाचा बॅनर आहे. तर कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण?'..जनतेला उत्तर द्या असा भाजपचा बॅनर आहे.