भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेतंर्गत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी यशस्वी कारवाई करत वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर निरीक्षक मनीष मुरलीधर सहारे (वय ५० वर्षे) यांना ३५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. शासकीय कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने रचलेल्या सापळ्यात सहारे अलगद अडकले. दि. २० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून, सध्या आरोपीच्या घराची...