किशोर वयात योग्य मार्गदर्शन लाभले नाही तर मुलं-मुली आपल्या मनातील अनेक प्रश्न, अनेक शंका मनातल्या मनात दडपून टाकतात. ती चुकीच्या मार्गाने शंकांची उत्तरे शोधतात, मनात चुकीचे समज घर करून बसले की आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. किशोरावस्थेत मनात येणाऱ्या अशाच ४० प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे आणि माहिती जाणून घेऊ