खुलताबाद: आगामी निवडणुकांत धनुष्य-बाण आणि कमळ युतीला थारा, बाकी कोणाला नाही! आमदार प्रशांत बंबांचा गौप्यस्फोट; व्हिडिओ व्हायरल
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा युती विजयी होणार असून इतर कोणत्याही पक्षाला थारा नाही, असा विश्वास आमदार प्रशांत बंब यांनी आज दि २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता व्यक्त केला.ते खुलताबाद येथे आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते.बंब म्हणाले की, राज्यातील जनतेचा विश्वास फक्त शिवसेना-भाजपा युतीवर आहे.युती सरकारच्या विकासकामांमुळे मतदारांमध्ये उत्साह आहे.या निवडणुकीत विरोधकांना जागा शोधायलाही कठीण जाईल, असा टोला त्यांनी लगावला.