साक्री: पिंपळनेर- सटाणा या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
Sakri, Dhule | Nov 23, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपळनेर दौऱ्यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागले आहे पिंपळनेर शहराचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्न असलेला पिंपळनेर- सटाणा महामार्ग गेल्या अनेक महिन्यापासून खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे रखडलेला आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सोमवारी पिंपळनेर दौऱ्यावर असल्याने सदर रस्त्याच्या कामाचा मुहूर्त यंत्रणेकडून काढण्यात आला आणि तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.