वडवणी: महाविकास आघाडीचा वडवणी तहसीलवर मोर्चा!
Wadwani, Beed | Oct 1, 2025 वडवणी तालुक्यात आज बुधवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी, असे मागण्यात आले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे या सर्व मागण्या महाविकास आघाडीकडून तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आल्या.मोर्चादरम्यान आघाडीने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.