जालना: मौजपुरीत शेतकर्यांचा जीवघेणा प्रवास; नदीवर पुलाच्या अभावामुळे शेती, शिक्षण आणि उपजीविकेला फटका; नदीवर पुलाची मागणी
Jalna, Jalna | Oct 30, 2025 मौजपुरी गावच्या पूर्वेला वाहणार्या नदीमुळे शेतकर्यांना आणि ग्रामस्थांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गावच्या सुमारे 90 टक्के शेतीचे क्षेत्र नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतीकाम, दूध विक्री आणि रोजच्या दैनंदिन गरजांसाठी नदी पार करावी लागते. गुरुवार दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नदीला पूर आल्याने शेतकरी नदीपलीकेडे अडकून पडले. नदीच्या पलीकडे बारड वस्ती, ढोकळे वस्ती, शामगिर वस्ती, दळवे वस्ती आणि एक तांडा अशी अनेक वस्त्या आहेत.