चाकूर: माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नळेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसानीची केली पाहणी
Chakur, Latur | Sep 21, 2025 माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हा तसेच स्थानिक पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासह चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे श्री वागंभर वेळापुरे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रातिनिधीक स्वरूपात पाहणी केली. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या आधाराची आणि मदतीची गरज आहे, आपण त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून आपदग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.