दारव्हा: लाडखेड पोलिसांची दारूच्या नशेत चालकाला मारहाण, दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार
लाडखेड पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाने दारूच्या नशेत एका ट्रॅक्टर चालकाला मारहाण केली आणि मालकाकडे पैशांची मागणी केली असा गंभीर आरोप वडगाव गाढवे येथील एका नागरिकाने केला आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून रात्री उशिरापर्यंत ठाण्यात बसवून ठेवल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी पीडित ट्रॅक्टर मालक अवधूत किशन बोंबले यांनी दारव्हा येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.