धारदार चाकू घेऊन फिरत असलेल्या तरूणाला पोलिसांनी पकडले असून ही कारवाई शहर पोलिस ठाण्यांतर्गत मरघट परिसरात बुधवारी (दि.७) दुपारी २ वाजता दरम्यान करण्यात आली.आकाश उर्फ डबल राधेश्याम भालाधरे (२३, रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड) हा मरघट परिसरात धारदार चाकू घेऊन फिरत होता. याबाबत माहिती मिळताच हवालदार सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, पोलिस शिपाई रावते, बंजारे, बिसेन, सोनवाने यांनी त्याला पकडले. त्याच्याकडून ३६ सेंमी लांब, पात्याची लांबी २४ सेंमी,