पनवेल: नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान
Panvel, Raigad | Dec 1, 2025 नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणा-या 8 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ आज सोमवारी महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव आदी मान्यवर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.