मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर धरण परिसरात आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले.या घटनेमुळे धरणावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.बिबट्याचे दर्शन धरणाच्या आजूबाजूच्या भागात झाल्याने,धरणावर जाणाऱ्या पर्यटकांनी तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगावी,असे आवाहन करण्यात आले आहे.