खुलताबाद: बाजार सावंगी परिसरात कापसाच्या वाती,शेतकरी सापडला संकटात, केलेली मेहनत आणि पैसा वाया
खुलताबाद तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. बाजार सावंगी, वेरुळ, गल्लेबोरगाव या भागात रोज सकाळी आणि संध्याकाळी पाऊस झाला. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस मातीत मिसळला. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचा चिखल झाला.यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पीक जोमात आले होते. मात्र सप्टेंबरमध्ये फुलांवर असतानाच संततधार पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. फुलांची आणि फळांची धारणा कमी झाली