कारंजा: अल्पभूधारक शेतकऱ्याची गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या भादोड (सुकळी )येथील घटना एकच खळबळ...
Karanja, Wardha | Sep 24, 2025 नापिकी व ओल्या दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्यांनी गावातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची घटना ता.२३ला रात्री ९.३० ते १० च्या सुमारास भादोड येथे घडली यामुळे एकच खळबळ उडाली खरंगणा पोलिसांना या घटनेची माहिती देता पोलिसांनी घटनास्थळ गाठले पंचनामा केला आज दुपारी अकरा ते बाराच्या सुमारास या शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला उत्तरीय तपासणीनंतर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अंबादास सहदेव कुशराम वय 55 असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे..