भिवंडी: भिवंडीच्या काशेळी पुलावर आढळली बेवारस कार
Bhiwandi, Thane | Oct 13, 2025 आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास भिवंडी येथील कशेळी पुलावर एक बेवारस कार आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळी कशेळी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कडेला उभी असलेल्या करामुळे देखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र तपासत आढळून आले की पुलाच्या कठड्यावर मोबाईल फोन सोडून देण्यात आला. काही क्षणपूर्वी या पुलावरून कार चालकाने उडी घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.