धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कुसुंबा गावातील दुचाकी चोरी प्रकरणाचा वेगाने पर्दाफाश केला. चोरीची दुचाकी विक्रीसाठी धुळे शहरात आणली जाणार असल्याची माहिती मिळताच, पीआय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संतोषी माता चौकात सापळा रचून दोन चोरट्यांना जेरबंद केले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना धुळे तालुका पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.