चंद्रपूर: सोयाबीन व कपाशी गेल्याने शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, वंधली येथील बेपत्ता शेतकऱ्याचे प्रकरण
वंधली येथे तरुण शेतकरी मनिष रामदास भोयर (४०) हा तरुण दिनांक १६ ऑक्टोंबर पासून घरून निघून गेला त्यानंतर तो परतलाच नाही म्हणून घरच्यांनी चौकशी केली, त्यावेळी गावातील लोकांनी तसेच पोलीस पाटील यांनी संपूर्ण शेतशिवार शोधून काढला पण भेटला नव्हता. मात्र आज दिनांक १८ ऑक्टो. २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता वंधली शेत शिवारात राजेंद्र डाफ यांच्या शेतातील विहिरीमध्ये मृतदेहपाण्यावर तरंगतांना आढळला.