हिंगणघाट: संत तुकडोजी वार्डातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा:नागरीकांसह सहकार नेते ॲड कोठारी यांची न.प.कडे मागणी
हिंगणघाटच्या संत तुकडोजी वार्डातील नागरिकांनी सहकार नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड सुधिरबाबू कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देत संत तुकडोजी वार्डमधील रोड बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून रस्ते नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना यावेळी करावा लागला आहे. त्यामुळे या परिसरात रोड नाल्या याचे काम लवकरच लवकर करण्यात यावे अशी मागणी केली.