सेलू: शिवनगाव शिवारात अवैध मोहा दारू भट्टीवर सेलू पोलिसांची कारवाई; आरोपीस अटक
Seloo, Wardha | Nov 10, 2025 मौजा शिवनगाव शिवारात अवैध मोहा दारू भट्टीवर सेलू पोलिसांनी आज ता . 10 सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2 लाख 28 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनिल विठोबाजी चिचघरे (वय 55 वर्षे, रा. शिवनगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दुपारी 12.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.