महायुतीच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघात मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. "आमचा अपमान करणाऱ्यांसोबत युती नको," अशी ठाम भूमिका घेत भाजप कार्यकर्त्यांनी आता थेट 'वैजापूर शहर विकास आघाडी' स्थापन करून निवडणूक लढवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.