खुलताबाद: वेरुळमध्ये भर उन्हात पावसाची सर,निसर्गाचा अनोखा खेळ नागरिक थक्क, व्हिडिओ व्हायरल
आज दि २५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास खुलताबाद शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पाऊसाने हजेरी लावली दरम्यान वेरुळ परिसरात अचानक पावसाने हजेरी लावत उन्हातच गारवा आणला.निसर्गाचे हे अनोखे रूप पाहून नागरिक आणि पर्यटक थक्क झाले.भर उन्हात बरसलेल्या सरींनी वातावरण सुखद बनवले.नागरिक आणि पर्यटकांनी या अद्भुत दृश्याचा मनसोक्त आनंद घेतला.दरम्यान निसर्गाचे हे अनोखे रूप सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.