घनसावंगी: अतिवृष्टीमुळे बंगलेवाडी सह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त पिकांची आमदार हिकमत उढाण यानी केली पाहणी
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे बंगलेवाडी सह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. आमदार हिकमत दादा उढाण यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणीवेळी तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.