गडचिरोली: सिरोंचा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, संदीप कोरेत मित्र परिवाराचे तहसीलदारांना निवेदन
मागील पंधरा दिवसापासून सिरोंचा तालुक्यात सूरु असलेल्या संततधार पावसामुळे व पूरपरिस्थिती मुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे व त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे त्यामुळे सिरोंचा तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संदीप भाऊ कोरेत यांच्या मार्गदर्शनात संदीप भाऊ कोरेत मित्रपरिवार सिरोंचा तालुका तर्फे तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन पाठविण्यात आले